एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

व्याकरण

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती

 १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४) क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
२) शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

शिक्षक दिन -- वंदावी तुझी पावले



 शिक्षक दिन -- वंदावी तुझी पावले 

 

       ह्या जगात सर्वात पवित्र, निर्मळ आणि निःस्वार्थ नाती दोनचं! एक मातेचं आणि दुसंर मास्तरांचं! आई जन्म देते तर मास्तर जीवन जगण्याची कला शिकवतात आणि आमचं सौभाग्य, ती कला शिकवणारे मास्तर दुसंर कुणी नसून तुम्ही आहात.

         'आपण ह्या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून त्या समाजासाठी काही केलं पाहिजे..' हे खुपदा ऐकलं होत पण त्याचा खरा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. यापूर्वी खुपदा वाचलेले गांधी, विवेकानंद आज नव्यानी कळले. जीवनाचे खूप सारे संदर्भ तुम्ही समजावून सांगितले. प्रसंगी आमच्या भल्यासाठी स्वतः त्रास सहन केलात. कधी आईची माया दिली.. कधी बापाचा धाक तर कधी भावाचा आधार... सगळ्या भूमिका अगदी चोख बजावल्यात. एखाद्या जादूगारा प्रमाणे तुम्ही आम्हा सर्वांमधलं चांगल हुडकून ते समाज हितासाठी कसं वापराव हे नेमक शिकवलंत... कधी निराशेत धीर दिला आणि स्वप्न पाहण्याची नवी उमेद.. नुसती स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात ती पूर्ण करण्यासाठी ध्येय वेड होऊन स्वताला झोकून द्याव लागत हे ही तुम्हीच शिकवलत. 'बदललेल्या काळात काही संदर्भ जुनेच आहेत म्हणून बाळ सामान्यांच्या डोळ्यातला सूर्य जरी नाही बनू शकलीस तरी पणती हो. प्रकाशाने अंधार भेदाला जातो यावर लोकांचा विश्वास जागा ठेव. ' म्हणत कायम आम्हाला मार्गदर्शन केलंत. म्हणूनच तुम्ही आम्हा सर्वांचे दीपस्तंभ आहात!

        अजूनही आठवतो तो शाळेतला तास... पाटील सर अत्यंत रंगवून 'कणा' कविता शिकवीत होते. कवितेमधला पूर प्रत्येकाच्या पापण्याच्या कडांशी आला होता आणि सरांनी कवितेचा समारोप केला, 'सर,पाठीवरती हाथ ठेवून नुसतं लढ म्हणा..!' पण खर सांगू का सर, पाठीवर नुसतं हाथ ठेवून उभारी द्यायला मास्तर पण तसा दमदार लागतो...तुमच्या सारखा!

" गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:।



गुरूरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:॥ "

आणि असा गुरु मला लाभले हे माझ सौभाग्य! पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी रास्त प्रयत्न करण्याचा आशीर्वाद द्या सर..